। श्रीवर्धन । वार्ताहर ।
महाड शहरातील छ.शिवाजी महाराज चौक आणि वीरेश्वर महाराज चौक येथे प्रवाशांसाठी निवारा शेडची नितांत आवश्यकता आहे. पूर्वी छ.शिवाजी महाराज चौक येथे निवारा शेड होती. परंतु, येथे आता गाळे उभे राहिले आहेत. माणगाव, पनवेल, मुंबई, पुणे, सातारा इ. ठिकाणी जाणारे प्रवासी उन्हातान्हात तसेच पावसात एसटीची वाट पहात उभे असतात. तरी वरील दोन ठिकाणी लवकरात लवकर प्रवाशांसाठी निवारा शेड उभारण्यात येऊन एस.टी.ने प्रवास करणा-या प्रवाशांची गैरसोय सक्षम यंत्रणेने दूर करावी व प्रवाशांचे हाल थांबवावेत, अशी रास्त मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.