। अलिबाग । प्रतिनिधी
बिबट्याचा नागावमध्ये वावर असल्याची माहिती मिळताच वन विभागाची धावा धाव सुरू झाली आहे. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीम देखील नागावमध्ये दाखल झाली आहे. नागावमध्ये मोकाटपणे फिरणाऱ्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी ही टीम कामाला लागली आहे.
सतर्क रहा- हर्षदा मयेकर
नागावमध्ये बिबट्या आला असून त्याने दोघांवर हल्ला केला आहे. सध्या नागावमध्येच त्याचा वावर असून वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आम्ही सर्वांनीच त्याला पाहिले आहे. त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु असून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.






