। पुणे । प्रतिनिधी ।
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन झालं आहे. बाबा आढव हे कष्टकरी आणि श्रमिकांचे नेते म्हणून ओळखले जाणारे नेते होते. बाबा आढाव गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारा दरम्यान त्यांची सोमवारी (दि.8) प्राणज्योत मावळली. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बाबा आढाव यांचं रात्री साडे आठ वाजता निधन झालं. त्यांच्या निधनमुळे असंघटित कामगारांचा आवाज बुलंद करून त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा नेता हरपला अशी भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. बाबा आढाव खऱ्या अर्थाने संघर्ष करणारे नेते होते. त्यांनी गेल्यावर्षी ईव्हीएमच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी सलग तीन दिवस ईव्हीएमच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन केलं होतं.







