महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मंगळवारी आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडतीचे आयोजन करण्यात आले. या सोडतीमध्ये वीस प्रभागांतील अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, महेशकुमार मेघमाळे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त नानासाहेब कामठे, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, सचिव अक्षय कदम, उपायुक्त वैभव विधाते, कार्यकारी अभियंता सुधीर सांळुखे, आरेखक नितीन हुद्दार, निवडणूक विभाग प्रमुख नामदेव पिचड, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रारूप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी विहीत नमुन्यात 17 नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहत. तर, प्रारूप आरक्षण व हरकती व सूचना मागविण्याची अंतिम तारीख 24 नोव्हेंबर असणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक नाट्यगृहात उपस्थित होते.

Exit mobile version