। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी मंगळवारी (दि.21) मतदान प्रक्रिया पार पडल्यावर गुरुवारी (दि.23) सकाळी 11 वाजता उर्वरित वार्ड क्र.6, 8, 14 व 17 येथील चार जागांच्या निवडणुकीसाठी आरक्षणाबाबतची बैठक मध्यवर्ती प्रशासकीय भवन, तहसील कार्यालय माणगाव याठिकाणी तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर व मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या उपस्थितीत पार पडली. प्रभाग क्र.6 हा सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र.8 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र.14 सर्वसाधारण खुला तर प्रभाग क्र.17 सर्वसाधारण खुला जागेसाठी आरक्षित झाल्याचे तालुक्याचे उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी जाहीर केले. यावेळी मदतनीस म्हणून त्यांच्यासमवेत माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे उपस्थित होते. तसेच या आरक्षण सोडतील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







