विशेष गाडीचे आरक्षण सुरु

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

गणेशोत्सवामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाढलेली गर्दी लक्षात घेता रविवारी (दि.15) मडगाव ते पनवेल मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. एकूण 20 एलएचबी डब्यांसह ही गाडी धावणार असून या विशेष गाडीसाठी आरक्षण मंगळवार (दि.10) पासून सुरु झाले आहे.

गणपती विसर्जनानंतर वाढलेली गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने गर्दीनुसार विशेष गाड्यांचे नियोजन करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यानुसार मडगाव ते पनवेल मार्गावर 15 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता विशेष गाडी (01428) सुटेल. पनवेलला ती रात्री सव्वादहा वाजत पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (01427) पनवेल येथून रात्री पावणेबारा वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी अकरा वाजता मडगावला पोहोचणार आहे.

Exit mobile version