। अलिबाग । प्रतिनिधी ।
अतिवृष्टीमुळे कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली व अमरावती यांनी जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता आरक्षण सोडतीसाठी जाहीर केलेला आरक्षण सोडत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबतची विनंती शासनाला केली होती. यानुषंगाने शासनाने आरक्षण सोडत कार्यक्रम तसेच मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम तूर्त स्थगित करण्याचे आदेश जारी केले आहेत.