एस व्यंकटरामनन यांचे निधन

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एस व्यंकटरामनन यांचे 92 व्या वर्षी निधन झाले आहे. दीर्घ आजाराने ते पीडित होते. त्यांच्या मागे दोन मुली आणि त्यांचा परिवार आहे. एस व्यंकटरामनन हे आरबीआयचे 18 वे गव्हर्नर होते. त्यांनी 1990 ते 1992 या दरम्यान दोन वर्ष हा पदभार सांभाळला होता. याआधी त्यांनी अर्थ मंत्रालयामध्ये 1985 ते 1989 या काळात अर्थ सचिव म्हणून कार्य केलेलं होतं.

गव्हर्नर असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचं सांगितलं जातं. आरबीआयचे गर्व्हरनर याशिवाय व्यंकटरामनन यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. ते राज्य आणि केंद्र सरकारमध्ये महत्वाच्या पदांवर होते. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आर्थिक बाबींवर अनेकदा सल्ला दिला.

Exit mobile version