| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील प्रसिद्ध लोकमान्य टिळक रुग्णालयातील (सायन रुग्णालय) एका निवासी डॉक्टरने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या डॉक्टरचे नाव शिवचरण आप्पा पाटील असे आहे. या निवासी डॉक्टरने ॲनास्थेशियाचा ओव्हरडोस घेऊन स्वत:चे जीवन संपवल्याचे उघडकीस आहे. हॉस्टेलमधील त्यांच्या रुमच्या बाथरुममध्ये शिवचरण याचा मृतदेह सापडला आहे.
निवासी डॉक्टरांच्या आत्महत्येने लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये खळबळ उडाली आहे. याआधी जे.जे. रुग्णालयाच्या एका डॉक्टरने आत्महत्या केली होती. आता लोकमान्य टिळक हॉस्पिटलमधील डॉक्टराच्या आत्महत्येमुळे वैद्यकीक विश्वात खळबळ उडाली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. शिवचरण पाटील हा सर्जरी विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्गात शिकायला होता.
भुलीचे इंजेक्शन टोचून निवासी डॉक्टरने जीवन संपवले
