मच्छीच्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास

भविष्यात रोगराई पसरण्याची भिती, नियमित साफ-सफाई करण्याची मागणी
| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली शहरातील मच्छी मार्केटच्या प्रवेशद्वारावर पाय ठेवला की, कोंबड्यांच्या दुर्गंधीयुक्त उग्र वासाने मच्छी मार्केट मध्ये येणार्‍या प्रत्येक नागरिकाला आपला हात नाक व तोंडावर धरूनच आतमध्ये प्रवेश करावा लागत आहे. येथे कोंबड्यांची पिसे मोठ्या प्रमाणात पडलल्याचे दृश्य देखील पहायला मिळत आहे.याकडे नगरपालिका प्रशासनाने गांभिर्याने लक्ष दिला नाही तर या दुर्गंधीमुळे भविष्यात रोगराई पसरायला वेळ लागणार नाही.

नगरपालिकेच्या अखत्यारीतील मच्छी मार्केट हे खोपोली शहरातील पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस असून ते मुंबई – पूणे जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाला लागूनच आहे.या ठिकाणी घाटावर जाणार्‍या सर्व प्रवासी थांबलेले असतात.मच्छी मार्केटचा लागूनच भाजी मंडई आहे.यामुळे या परिसरात दिवसाला हजारो लोक ये-जा करतांना दिसत असतात.या मच्छी मार्केटच्या प्रवेशद्वाराला लागूनच मुंबई -पूणे मुख्य रस्त्याच्या कडेला कचरा जमा केला जातो. हा कचरा नियमित साफ केला जात असला तरी या कचर्‍यात पुजलेली भाजी वगैरे मोठ्या प्रमाणात टाकली जात असल्याने त्याचाही उग्रवास येत असतो.

मात्र आता मच्छी मार्केटच्या कोंबड्यांच्या उग्र वासाने लोकांना नकोसे केले आहे.या वासाने उलटी आल्यासारखे वाटते.या मार्केटमध्ये चिकन,मटन आणि मच्छी घेण्यासाठी अनेक लोक येत असतात हे लोक फक्त शहरातील नसून खालापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग पहायला मिळतो.त्यामुळे येथील दुर्गंधी ची चर्चा आता संपूर्ण खालापूर तालुक्यात होतांना दिसत आहे. मच्छी मार्केटच्या प्रवेशद्वारावरील कोंबड्यांची सफेद पिसे मोठ्या प्रमाणात पडलेली असून या ठिकाणी सर्वत्र कोंबडीच्या इष्टेचा उग्रवास येत असल्याने हा संपूर्ण परिसर स्वच्छ करून त्यावर रोगप्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

काल अचानक मच्छी मार्केटच्या मित्राच्या बरोबर यावे लागले तर मच्छी मार्केटच्या प्रवेशद्वारावरील दुर्गंधीयुक्त उग्र वासाने नकोसे वाटले.नाक तोंड दाबून धरले तरी हा उग्रवास सहन होत नव्हता.कोंबडीच्या दिसांनी प्रवेशद्वाराच्या आतील भाग व्यापलेला आहे.या ठिकाणी दररोज स्वच्छता झाली पाहिजे अन्यथा यामुळे येथे येणार्‍यांना यांचा त्रास नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही.कदाचित यामुळे रोगाची उत्पत्ती होण्याची जास्त शक्यता असल्याने नगरपालिकेने याकडे गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. -विलास गुरव, वावोशी, खालापूर

Exit mobile version