। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील आरिवली आणि आष्टे गावाच्यामध्ये पाणथळ जागेवर गावातील नागरिकांना बिबट्या दिसून आला आहे. याबाबत वनविभागाचे अधिकारी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली. बिबट्याच्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पनवेल तालुक्यात जंगलमय भाग आहे. त्यामुळे जंगलातून एखादा बिबट्या शिकारीच्या नादात गावांमध्ये येऊ शकतो. आरीवली आणि आष्ट्ये गावाच्या मध्ये असलेल्या तलावाजवळ नागरिकांना बिबट्या दिसून आला. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले. याची माहिती वनविभागाला देण्यात आली.
गेल्या चार दिवसांपासून बिबट्या दिसत असल्याचे नागरिकांनी सांगितले. वनविभागाने याबाबत स्थळ पाहणी केली आहे व ग्रामपंचायतींना पत्र लिहून नागरिकांना सतर्क करण्याचे आवाहन केले असल्याचे सांगितले. तसेच बॅनर छापून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे, असे वन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.