रहिवासी सेवा संघाचा स्नेहमेळावा

| पाली/बेणसे | वार्ताहर |

ठाण्यात वास्तव्यास असलेल्या सुधागड तालुका रहिवाशांच्या सेवेसाठी झटणाऱ्या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे या संस्थेतर्फे स्नेहमेळावा कार्यक्रम शनिवारी रायगडगल्ली, पाचपाखाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी महिला मंडळाचा हळदीकुंकू समारंभही पार पडला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण पुंडलिक मोरे यांच्या स्वरतेज, मराठी वाद्यवृंद कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली.

यावेळी नरेश म्हस्के, गोपाळ लांडगे, आमदार ॲड. निरंजन डावखरे, अशोक वैती, संदीप लेले, रुचिता राजेश मोरे, नारायण पवार, विजय सागळे या मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांचे स्वागत विठ्ठल घाडगे, शंकर काळभोर, प्रकाश शिलकर, सुरेश शिंदे, रमेश सागळे, शिवाजी दळवी, जनार्दन घोंगे, गणपत डिगे, राजू पातेरे, विजय पवार, विजय जाधव आदींनी केले.

तसेच विठ्ठल खेरटकर, वसंत लहाने, प्रविण तेलंगे, बबन चव्हाण, अविकांत साळुंके, अजय जाधव, हरिश्चंद्र मालुसरे, श्याम बगडे, गजानन जंगम, दत्ता सागळे, अनिल चव्हाण, भगवान तेलंगे, अनिल चव्हाण, रघुनाथ इंदुलकर, सुधीर मांढरे, चंद्रकांत बेलोसे, जयगणेश दळवी, सुनिल तिडके आदी पदाधिकार्यांसह सुधागड तालुका महिला मंडळ यांनी उपस्थिती दर्शविली.

Exit mobile version