निल्स लेक व्ह्यू सोसायटीत बाबासाहेबांना अभिवादन
। पनवेल । वार्ताहर ।
बाबासाहेबांनी देशाला जगातील सर्वोत्कृष्ट घटना दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे देशातील सर्वोच्च व्यक्ती आहेत. संपूर्ण जगभरात बाबासाहेबांचे सर्वाधिक पुतळे आहेत. त्यांनी गरिबीतून, हलाखीच्या परिस्थितीत उच्च शिक्षण घेतले. सर्व पिढ्यांनी त्यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. बाबासाहेबांचे जीवनकार्य सर्वांनी अभ्यासले पाहिजे. तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन कोल्हापूर माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ.संभाजी खराट यांनी केले. ते खांदा कॉलनी येथील निल्स लेक व्ह्यू सोसायटीत आयोजित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती उत्सवानिमित्त बोलत होते.
निल्स लेक व्ह्यू सोसायटीमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ज्ञानदिन साजरा करण्यात आला, तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. विशेषत्वाने लहान मुलांना, शालेय विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे विचार, महत्व कळावे यासाठी मला कळलेले बाबासाहेब या विषयावर इंग्रजी व मराठी भाषेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी धनंजय गायकवाड यांनी उत्कृष्टपणे पार पाडली.
ग्रंथालयाच्या निर्मितीचा संकल्प
