। पनवेल । वार्ताहर ।
नील्स लेक व्ह्यू सोसायटी, खांदा कॉलनी आणि सोहम फाऊंडेशन खांदा कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोहम फाऊंडेशनतर्फे महिलांसाठी हेल्थ किटचे वाटप करण्यात आले.
नील्स लेक व्ह्यू सोसायटीचे चेअरमन व्यंकटेश अण्णा, सोहम फाऊंडेशनच्या अध्यक्षा मंजिरी मुळे, सचिव अॅड. आश्लेषा मुळे, रुमा घोष, कीर्ती कुलकर्णी, रचना त्रिपाठी, प्रविणा आनंद आदींनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा याप्रकाराच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.