पाच हजार महिलांना देवदर्शन घडविणार

शिरगाव सरपंच सोमनाथ ओझर्डे यांचा संकल्प

| महाड | प्रतिनिधी |

तालुक्यातील शिरगाव गावचे सरपंच व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाड विधानसभा उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी करंजाडी जिल्हा परिषद गटातील पाच हजार महिलांना देवदर्शन घडवण्याचा संकल्प केला असून, त्याची सुरुवात शनिवार, दि. 8 नोव्हेंबर रोजी विन्हेरे गावातून चतुर्थीच्या दिवशी गणपतीपुळे येथे देवदर्शनाच्या यात्रेने केली.

सोमनाथ ओझर्डे यांनी करंजाडी जिल्हा परिषद गटातील पाच हजार महिलांना देवदर्शन घडविण्याचा संकल्प सोडला असून, त्याची सुरुवात विन्हेरे गावातील 130 महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसमधून सकाळी नऊच्या सुमारास गणपतीपुळे येथील गणपतीच्या देवदर्शनासाठी रवाना झाल्या. यावेळी सोमनाथ ओझर्डे यांच्या पत्नी प्राजक्ता ओझर्डे, शिरगाव उपसरपंच सौ. सागवेकर, प्रिया नष्टे, नितेश जंगम, नरेश जाधव, अक्षय भोसले, प्रतीक जगताप, माऊली खेडेकर उपस्थित होत्या.

Exit mobile version