| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील ग्रामस्थ मंडळ वावंजे कुंभारपाडा ब्राह्मण आळी यांच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी (दि. 15) वावंजे समाज मंदिर या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकापचे वावंजे गावचे सरपंच डी.बी. म्हात्रे, परेश पाटील, कृष्णा पवार, अॅड. सुजाता पाटील, उज्वला सांगडे, कांचन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी दीपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यानंतर खेळ रंगला पैठणीचा, फुगे फुगवणे आदी खेळ खेळवण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला वावंजे ग्रामपंचायतीमधील महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. हा महिला दिनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.