एकविरा आई पालखीचा आपटा कोळीवाड्याला मान

| रसायनी | वार्ताहर |
आपटा कोळीवाडा ते कार्ला एकविरा आई पदयात्रा ही 125 वर्षांपेक्षा जास्त काळातील वडिलोपार्जित चालत आलेली परंपरा असून, यावर्षी 26 मार्च रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून आपट्याहून एकविरा आईची पालखी निघाली. यावर्षीचा एकविरा आईच्या पालखीचा मान हा आपटा कोळीबांधवांचा असल्याने मोठ्या संख्येने कोळीबांधव, तरुणाई आईच्या नावाचा जयघोष करीत पदयात्रेत सामील होऊन डिजेच्या तालावर थिरकताना दिसत होती.

यावेळी रसायनी गुळसुंदे, वावेघर, खाने आंबिवली, मोहोपाडा, नवीन पोसरी, चांभार्ली, अपूर्वा हॉटेल गणेशनगर, रिस, दांडफाटा आदी ठिकाणी नाश्त्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परिसरात एकविरा आईची ठिकठिकाणी महिलांनी खणानारळाने ओटी भरुन पूजा केली. रविवारी दुपारचे जेवण विणेगाव वावंढळ येथे झाले.सांयकाळची वस्ती खोपोलीत होवून मध्यरात्री 2.30 वाजता घाट चढायला सुरुवात होईल.सोमवारी सकाळी पालखी कार्ला येथे एकविरा आईच्या गडावर पोहोचणार असून, मंगळवारी आईची पालखी व मानपान कार्यक्रम होणार असल्याचे आपटा ग्रामपंचायतीचे उपसरपंच मयूर शेलार यांनी सांगितले.

Exit mobile version