ठाकरे गटात कार्यकर्त्यांचा सन्मानः सचिन अहिर

। कर्जत । प्रतिनिधी ।

कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांनी आठवड्याभरातच पुन्हा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांचा सन्मानच राखला जातो, असा टोला शिवसेना (उद्धव ठाकरे) उपनेते सचिन अहिर यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षाला मारला आहे. अनिल सानप यांचे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात स्वागत करण्यात आले, त्यावेळी सचिन अहिर बोलत होते.

खोपोली शहरातील कार्यकर्ते अनिल सानप यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला होता. मात्र, आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते हे नवीन कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत आणि त्यामुळे शिवसेना पक्षातून अनिल संप यांनी पुन्हा स्वगृही परत येण्याचा निर्णय घेतला. खोपोली येथे प्रचार फेरीसाठी शिवसेना (उद्धव ठाकरे) उपनेते सचिन अहिर आले असता जेष्ठ शिवसैनिक अनिल संप यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. यावेळी विधान परिषद सदस्य आमदार सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना वागणूक फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना (उद्धव ठाकरे) देत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Exit mobile version