आधारकार्ड शिबिरास प्रतिसाद

| रसायनी | वार्ताहर |

ग्रुप ग्रामपंचायत वासांबे-मोहोपाडातर्फे मंगळवार दि.19 रोजी ग्रामपंचायतीच्या शिवांजली सभागृहात आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आधारकार्ड शिबिराचे उद्घाटन सरपंच उमा मुंढे यांच्याहस्ते करण्यात आले. या शिबिरासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 290 जणांनी नोंदणी केली होती. कागदपत्रे पहाणे, फॉर्म भरणे, फोटो व बोटांचे ठसे घेणे, स्वाक्षरी घेण्यात अधिक वेळ जात असल्याने मंगळवारी सायं 5:30 वाजेपर्यंत 74 जणांचे आधारकार्ड काम पुर्ण झाले. शिबिरामध्ये ज्यांचे आधारकार्डच नाही त्यांचे आधार कार्ड काढणे, आधार कार्डावरील नाव, पत्ता यामधील चूक दुरूस्त करणे,आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे, सध्याचा फोटो आधारकार्डंवर यावे आदी शिबिरात काम करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या ताईं पवार, दिपक कांबळे, प्रशाली खाने, स्वप्नाली मैदर्गींकर, सविता अगरवाल आदी उपस्थित होते.

Exit mobile version