आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराला प्रतिसाद

| कर्जत | वार्ताहर |

रोटरी क्लब कर्जत आणि कर्जत परिसर ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानयज्ञ सोहळा समितीच्या वतीने आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान, दादर – मुंबईतील ज्योविस आयुर्वेद, नारी सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने कर्जत मध्ये मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचे आयोजन कर्जत मधील पोलीस मैदानावर करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन ज्योवीस आयुर्वेद हॉस्पिटलच्या डॉ. राज सातपुते यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष जितेंद्र ओसवाल, डॉ. ज्योती सातपुते, आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश सुर्वे, माधव भडसावळे, सतीश श्रीखंडे, डॉ. प्रेमचंद जैन, सुनील सोहनी, संतोष वैद्य, शिवाजी भासे, अमोल देशमुख, वसंत ठाकूर, साजन ओसवाल आदी उपस्थित होते.

या शिबिरात डॉ. राज सातपुते, डॉ. मणिशंकर गुप्ता, डॉ. अश्विनी राठोड, डॉ. अदिती गायकवाड यांच्यासह पंधरा डॉक्टर आणि दहा आरोग्यसेवकांनी आरोग्य सेवा दिली. पित्त, पाठदुखी, वात, रक्त मोक्षण, आमवात, अग्निकर्म, लकवा आजाराचे रुग्ण यांची चिकित्सा करण्यात आली. बहिरेपणा, सांधे दुखी, कंबर दुखी, गुढघे दुखी आदी व्याधींवर उपचार करण्यात आले. रुग्णांची तपासणी आणि चिकित्सा करण्यात आली. तर रुग्णांच्या चामखीळ आणि भोवऱ्या डॉ . ज्योती सातपुते, डॉ. सलोनी लंकेश्वर, सोनल राईकवर, तत्काळ काढण्यात आल्या. एकूण 421 रुग्णांची तपासणी करून सर्व रुग्णांना मुंबई येथील नारी सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून औषधे मोफत देण्यात आली.

याप्रसंगी दिपचंद जैन, विशाल शहा, नितीन आहिर, सूर्याजी ठाणगे, अभिषेक सुर्वे, दत्तात्रय म्हसे, अनिल पाटील, आयेशा वाडकर, महेश क्षीरसागर, किरण पाटील, सोमनाथ ठोंबरे, ज्योती पाटील, शलाका मुसळे – गरुड, वसुधा ठाकूर आदी उपस्थित होते.

Exit mobile version