। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाज व खारेपाटण महाविद्यालय एनएसएस विभागाच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 43 जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष रमाकांत राऊत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, एनएसएस विभाग प्रमुख प्रा. वसीम सय्यद, ओरोस जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे डॉ. संकेत रोटे, खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस अंमलदार माने, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, मंगेश गुरव, महेश कोळसुलकर, संकेत शेट्ये, सुरेंद्र कोरगावकर आदी उपस्थित होते. खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाजातर्फे खारेपाटण सोसायटी सचिव अतुल कर्ले, खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे नव्याने रुजू झालेले पोलिस अंमलदार माने यांचा सकल मराठा समाजातर्फे सत्कार करण्यात आला.
या शिबिराला खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते चंद्रमोहन शिंदे, अरविंद कर्ले, श्रीकांत भालेकर, सुबोध देसाई, बळीराम भालेकर, धनराज शेलार, चंद्रकांत मण्यार, सुधाकर कर्ले, विनोद शेलार, महेश राऊत, अशोक पाटील, अरुण कर्ले, संदीप सावंत, बाळा राऊत, सुनील कर्ले, दिगंबर भालेकर, जगदीश सावंत, नाना शिंदे आदी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालय रक्त पतपेढीचे डॉ. संकेत रोटे यांच्यासह टेक्निशियन मयुरी शिंदे, नेहा परब, कांचन परब, नंदकुमार आडकर, नितीन बावकर, मिलिंद कांबळे आदींचे सहकार्य लाभले. खारेपाटण पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले. खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाज संघटनेचे सचिव ऋषिकेश जाधव यांनी आभार मानले.