रक्तदान शिबिराला प्रतिसाद

| तळा । वार्ताहर ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत तळा शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.या रक्तदान शिबिरासाठी पनवेल येथील श्री साई ब्लड बँकेचे डॉक्टर किशोर बडगुजर, योगेश पाटील, मानसी म्हात्रे, महेंद्रसिंग राजपूत व त्यांची टीम उपस्थित होती. या शिबिरात तालुक्यातील नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून जवळपास 51 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. याप्रसंगी रवि मुंढे, निलेश रातवडकर, लहू चव्हाण, रितेश मुंढे,तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version