नवी मुंबईत सीबीएसई प्रवेशाला प्रतिसाद

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने सीबीएसई शाळा सुरू केली होती. इतर खासगी शाळांच्या भरमसाठ फी भरून शिक्षण आवाक्या बाहेरचे असलेल्या पालकांना मात्र ही महापालिकेची सीबीएसई शाळा पसंतीस उतरत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस याला प्रतिसाद वाढत आहे. यंदा नर्सरीच्या 240 प्रवेशासाठी एकूण 1 हजार 114 अर्ज दाखल झाले होते. सकाळी 10 ते 1वाजेपर्यंत ही सोडत सुरू होती.

यावर्षी प्रवेश घेण्यासाठी 25मार्च पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. कोपरखैरणे येथील शाळा क्रमांक 94 मध्ये 673 अर्ज दाखल झाले असून 521 पात्र ठरले आहेत तर सीवूडस शाळा क्रमांक 93 मध्ये 442 अर्ज प्राप्त झाले असून 414अर्ज पात्र ठरले असून यापैकी 240 जागांसाठी लॉटरीच्या माध्यमातून निवड करण्यात येणार होती. कोपरखैरणे येथील शाळा क्रमांक 94 तसेच नेरुळ येथील शाळा क्रमांक 93 या करिता प्रत्येकी 120 जागांची सोडत व्यवस्थित पार पडला आहे.

नेरुळ येथील शाळेतील 1किमी च्या नुसार 104 विद्यार्थी पात्र ठरले असून त्यांना आधी प्राधान्य देऊन सोडत काढली. तर कोपरखैरणे येथील शाळेत 1 किमी परिघातील 70, तर 2 किमीतील 30 आणि 3 किमी परिसरातील 20 विद्यार्थ्यांना निवडून सोडत काढण्यात आली.

Exit mobile version