| अलिबाग | प्रतिनिधी |
माणुसकी प्रतिष्ठान, रायगड प्रिमियम लिग आणि सुरभी स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अलिबाग सांस्कृतिक कला व क्रीडा महोत्सवात रविवारी सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग तालुक्यातील 14 वर्षाखालील मुले व मुली आणि 17 वर्षाखालील मुले व मुली या वयोगटातील एकूण 89 शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेला राष्ट्रीय खो-खो पट्टू आशिष पाटील यांनी झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आली. यावेळी माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, रायगड प्रिमियम लिगचे सचिव जयंत नाईक, सुरभी स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया जेधे, माणुसकी प्रतिष्ठान अलिबागचे अध्यक्ष भुषण जंजिरकर, सदस्य संदीप वारगे, तानाजी आगलावे उपस्थित होते.