जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला प्रतिसाद; स्पर्धेत 113 जणांचा सहभाग

| खारेपाट । वार्ताहर ।

जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि व्ही.जी. पाटील एज्युकेशनल फाऊंडेशन खिडकी तसेच रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा यांचे संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील खिडकी गावचे सुपुत्र, माजी शिक्षक सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रिय व्यक्तिमत्त्व स्व.वासुदेव गणेश पाटील यांचे स्मृतिदिनानिमित्त जिल्हा स्तरीय खुल्या गटातील बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत अलिबाग, ऊरण, पनवेल, कर्जत ,खोपोली, पेण, पाली, गोरेगाव येथून एकूण 113 स्पर्धकांनी सहभाग घेतला.

यावेळी वेळी सुनील भोसले, आल्हाद पाटील, वैभव पाटील, गंभीर पाटील, जिल्हा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष विलास म्हात्रे, संदीप पाटील, सी एन पाटील, श्रेयस पाटील, सुशील गुरव तसेच आयुष अभानी पंच हे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र पाटील, दर्शन, सुदर्शन, हर्षल, संतोष, श्रीराम, अक्षय, निरज, धिरज, निखिल, नितीन पाटील यांनी अपार मेहनत घेतली.

खुल्या गटात प्रथम क्रमांकाचा मानकरी उरणचा धीरज पाटील राहिला. द्वितीय क्रमांक गोवर्धन वसावे-पनवेल, तृतीय क्रमांक गणेश पाटील-अलिबाग यांनी मिळवला.

11 वर्षांखालील जिल्हा निवड स्पर्धेत मुलांच्या गटात प्रथम क्रमांक इ. अभिषेक-पनवेल, दुसरा कौस्तुभ भगत-पनवेल, तृतीय क्रमांक आर्यन मोडक-पेण याने तर उत्तेजनार्थ बक्षीस रुद्र कुतवाल, राज पेढवी यांनी मिळवला.

मुलींच्या गटात प्रथम क्रमांक स्मिती शेडगे-उरण, द्वितीय आरोही पाटील, तृतीय क्रमांक भार्गवी नायडू-गोरेगाव हिने, तर उत्तेजनार्थ पारितोषिक शर्वरी पाटील, सानवी म्हात्रे यांनी पटकावले.

Exit mobile version