सुतारवाडीत नेत्र तपासणीला प्रतिसाद

| सुतारवाडी | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील मौजे सुतारवाडी येथे लायन्स क्लब ऑफ कोलाडतर्फे रविवारी (दि. 10) मोफत नेत्ररुग्ण तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी 70 हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 10 रुग्णांना लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग येथे यांच्यावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष नरेश बिरगावले, उपाध्यक्ष डॉ. मंगेश सानप, अनिल महाडिक, नंदकुमार कळमकर, सुरेश जाधव, दत्ताराम मंचेकर, नथूराम साळवी, समृध्दी साळवी, राजाराम किर्जत, विजय सावंत, चिंतामणी दळवी, संदीप चिविलकर, हरिश्‍चंद्र महाडीक, डॉ. श्याम भाऊ लोखंडे, विश्‍वास निकम, दिनकर सानप, रविंद्र लोखंडे, राजेन्द्रर कोप्पू उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रतीक कणासे, हर्षद गोळे, कमलाकर काका, प्रतीक, सुमिता सह लायन मेंबर्स आदीने रुग्णांची तपासणी केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक मार्गदर्शन क्लबचे अध्यक्ष नरेश बिरगावले केले, तर सूत्रसंचालन डॉ. श्याम लोखंडे यांनी केले.

Exit mobile version