माणगावात नेत्रतपासणी शिबीरास प्रतिसाद

| माणगांव | वार्ताहर |

आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व उम्मते मुस्लीमा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ईद-ए-मिलादुन नबी निमित्त बुधवार दि. 18 ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह, जुने माणगाव ता. माणगाव याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात शंकरा आय हॉस्पिटलचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी 125 रुग्णांची तपासणी करून 15 नेत्ररुग्णांना पनवेल येथे नेऊन त्यांच्यावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

माणगावमधील मुस्लिम समाज बांधवांनी आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो हा उद्देश नजरेसमोर ठेवून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरासाठी चांढवा, वळवथा, सायगाव निगडी, पंदेरी आदि गावांतून नेत्ररुग्ण आले होते. या शिबिरास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, अकबर परदेशी, सुभाष केकाणे, दिनेश रातवडकर, सिराज परदेशी, अब्दुलरहिमान हाजिते, यासिन परदेशी, जावीद नदाफ यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिली. शिबिर यशस्वी करण्यासाठी सरफराज अ़फवारे, फहद करबेलकर, गुलजार खान, शादाब गैबी, बशिर करेल, इम्रान धवलारकर, इरफान हाजिते, इस्माईल पालेकर, मन्सुर मुकादम, नदीम परदेशी, मुस्तूफा वाडेकर, रफिक जामदार, सीराज अ़फवारे, सुहेब परदेशी, शाहनू अत्तार, अफाक दांडेकर, आमिर नदाफ, रिजवान चरफरे, नौशाद खान, यासिर मुकादम व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version