नेत्रतपासणी शिबिराला प्रतिसाद

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लायन्स क्लब मांडवा व लायन्स हेल्थ फाऊंडेशन, चोंढी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रामपंचायत सातिर्जे यांच्या सौजन्याने मंगळवार, 28 फेब्रुवारी रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. सातिर्जे येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे या शिबिरात 70 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. या 70 जणांपैकी 15 जणांमध्ये मोतीबिंदू आढळले. त्यांच्यावर चोंढी येथील डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात येऊन त्यांना मोतीबिंदूमुक्त करण्यात आले.

लायन्स क्लब मांडवाच्या या सेवाभावी उपक्रमासाठी लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी, जितेंद्र ठाकूर, मोहन पाटील, विजयराव देशमुख, अजय आंगणे, विद्या जितेश्री ठाकूर, नीलम देशमुख, सुमीत पाटील आदी लायन्ससह लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या चोंढी येथील डोळ्यांच्या हॉस्पिटलच्या मुख्याधिकारी डॉ. शुभदा कुडतलकर, तसेच त्यांचे नेत्रचिकित्सा पथक उपस्थित होते.

Exit mobile version