। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग अर्बन बँकेच्या शेजारी कर्वे रोड काँग्रेस भवन मध्ये येथे आयोजित केलेल्या हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीला ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील नामांकित कापड उत्पादन संस्थांचे सहभागी असलेले हे आगळे वेगळे प्रदर्शन आहे. सुप्रसिद्ध सोलापुरातील हातमाग वरील कॉटन साडी, इरकली साडी, पटोला खादी साडी, मदुराई सिल्क साडी, मदुराई कॉटन साडी, खादी कॉटन साडी, सिल्क साडी, गडवाल साडी, सेमी पैठणी बाटिक प्रिंटेड साडी, धारवाड साडी, बेळगाव साडी, सर्व प्रकारचे साड्या उपलब्ध आहेत. सुप्रसिद्ध सोलापुरातील चादर, बेडशीट, सतरंजी, पंचा टॉवेल, डोअर मॅट, वुलन चादर, लुंगी वॉल, हँगिंग हॅन्ड बॅग गाऊन, कॉटन शर्ट कुर्ता, बंडी याशिवाय हातमागावरील उत्पादन झालेले असंख्य व्हरायटी एकच ठिकाण हातमाग विणकाम करून तयार केलेले कापड हे अत्यंत चांगलं दर्जाचा असतोय भारतीय संस्कृतीचा प्रचारासाठी सातत्याने वाढल्याचे मत पांडुरंग पोतन यांनी व्यक्त केले. हे प्रदर्शन ग्राहकांच्या आग्रहानुसार 16 मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. प्रदर्शन वेळ सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे. तरी या प्रदर्शनाला एक वेळ अवश्य भेट द्या असे आवाहन त्यानी केले आहे.