सत्तर स्पर्धकांचा सहभाग
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथे स्वरानुभूती कलाविष्कार यांच्या वतीने आयोजित कराओके आयडॉल या संगीत स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी राज्याच्या विविध भागातील 70 स्पर्धा यांनी सहभाग घेतला होता.पाश्वर्र्गायिका सुचित्रा भागवत यांनी या स्पर्धेचे परीक्षण करताना सहभागी हौशी गायक आणि कलावंत यांना मार्गदर्शन केले.
विवेक दहिवलीकर तसेच चंद्रकांत काळे यांनी पुढाकार घेऊन कराओके आयडॉल ही संगीत स्पर्धा आयोजित केली होती. नेरळ गावातील साने हॉल मध्ये आयोजित स्पर्धेत राज्याच्या विविध भागातील 70 कराओके संगीत मधील हौशी कलावंत आणि गायक यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेची सुरुवात दीप प्रज्वलन करून प्रसिद्ध गायिका सुचित्रा भागवत यांनी केले. त्यावेळी कल्पना क्षीरसागर,विवेक दहिवलीकर,चंद्रकांत काळे आदी उपस्थित होते.स्पर्धेसाठी मुंबई,ठाणे,कसारा, टिटवाळा, डोंबिवली,अलिबाग,पनवेल,पेण,नवी मुंबई,कल्याण पासून कर्जत असा सर्व भागातील गायक सहभागी झाले होते.तीन टप्प्यात स्पर्धा असून पहिल्या फेरीत सहभागी 70 स्पर्धेक यांच्यामधून दुसर्या फेरीसाठी 40 तर तिसरी आणि अंतिम फेरीसाठी 26 स्पर्धक निवडण्यात आले.
स्पर्धेसाठी नेरळ गावातील रसिक प्रेक्षक यांनी मोठा प्रतिसाद दिला होता. सुचित्रा भागवत नवीन गायकांना मार्गदर्शन देखील केले.अशी स्पर्धा प्रथमच होत असल्याने या स्पर्धेविषयी उत्सुकता होती.70 स्पर्धकाच्या रंगलेल्या स्पर्धेत कराओके आयडॉल साठी उशिरापर्यंत स्पर्धा सुरु होती.