शोकसभेत मान्यवरांची आदरांजली
| धाटाव | वार्ताहर |
मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारक सरकारने पूर्णत्वास न्यावे हीच स्वर्गीय विनायकराव मेटे यांना खरी आदरांजली ठरेल अशी भावना येथे आयोजित केलेल्या शोकसभेत व्यक्त करण्यात आली.
रोह्यात नगरपालिकेच्या जेष्ठ नागरिक सभागृहात आयोजित शोकसभेला विजयराव मोरे,विनोद पाशिलकर ,रोहिदास पाशिलकर,महेंद्र गुजर,राजू जैन,नितीन परब,रत्नप्रभा काफरे, रविना मालुसरे, मंजुषा परब,रंजना खुमन,शमा पवार, प्रवीण पवार,अर्जुन सावंत,रामचंद्र भिलारे, रूपेश कदम, काशिनाथ लांबे,विजय मगर,नितीन चौहान,सुनील सत्वे,विष्णू कदम,आण्णा निंबरे,प्रकाश चांदीवडे,डॉ.देशमुख,शिंदे सर,रवी चाळके,उत्तम नाईक, महेश सरदार, राजेश काफरे,संदीप सरफळे,प्रशांत देशमुख,निलेश शिर्के यांसह जिल्ह्यातून विविध समाजाचे नेते, लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुहास येरूणकर यांनी केले
रोहा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप(आप्पा)देशमुख,,उस्मान रोहेकर, प्रा. साळुंख,अनंत देशमुख , शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष अविनाश सावंत ,समीर शेडगे, अमित घाग,सूर्यकांत मोरे, सुहास येरुणकर, प्राजक्ता चव्हाण, मयुरा मोरे, मयूर दिवेकर,अमित उकडे, गणेश देशमुख,राजेंद्र जाधव यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी मेटे यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. जिल्हाभरातून आलेल्या चाहत्यांच्या उपस्थितीत मेटे साहेबांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.