| आगरदांडा | प्रतिनिधी |
विकासाच्या नावाखाली शहरांमध्ये वाड्या तोडून झपाट्याने इमारती उभ्या राहात आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा र्हास होत असून, त्याचा परिणाम चिमण्यांच्या अधिवासावर होत आहे. त्यामुळे चिमण्यांचा चिवचिवाट बंद झाला आहे.
शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे इमारती वाढत असून, दुसरीकडे चिमण्यांची घरटी मात्र या परिसरामध्ये दिसेनाशी झाली आहेत. वाड्या तोडत असल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागाच उरलेली नाही, त्यामुळे प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, ही बाब पक्षीप्रेमींमध्ये चिंतेची बाब आहे.