| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड शहरात वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय परिसरात आठ फुटांपेक्षा लांब अजगर आढळून आले. परंतु मुलांच्या किलबिलाटामुळे ते अजगर उंच बदामाच्या अगदी शेंड्याला जाऊन बसले होते. ग्रंथपाल गजानन मुनेश्वर यांनी तात्काळ सर्पमित्र संदीप यांना पाचारण केले. परंतु, सर्प पकडण्याची काळी तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हती.
अखेर मुरुड नगरपरिषदेची मदत घेण्यात आली. फायर ब्रिगेडच्या उंच शिडीच्या साह्याने संदीप हे अजगराच्या जवळपास पोहोचले. त्यांनी त्या अजगराला पिशवीत भरले. त्यामुळे महाविद्यलयातील सर्व कर्मचार्यांनी सुटकेचा श्वास घेतला. सर्पमित्र संदीप घरत यांनी अजगरास प्रादेशिक वन विभागाच्या जंगलात सोडले.