| माणगाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यासेवक सहकारी पतसंस्था मर्यादित पेण यांच्यावतीने भारतीय स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत नूतन माध्यमिक विद्यालय खरवली विद्यालयाचा मंथन कृष्णा पेणकर, इयत्ता सहावी याने लहान गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती. या यशाबद्दल मंथन पेणकर यास रोख रक्कम 1500 रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. मंथनच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक गुळवणी, संस्थेचे अध्यक्ष अॅड. महेंद्र मानकर, मार्गदर्शक शिक्षक महेंद्र जंगम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.