पेण येथे नववर्ष शोभायात्रांना प्रतिसाद

। खरोशी । वार्ताहर ।
जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान व स्व स्वरूप संप्रदाय उत्तर रायगडजिल्हा यांच्यातर्फे गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होत. सकाळी साडेआठ वाजता उत्कर्ष नगर येथून निघालेली शोभायात्रा सुरुवात होऊन सांगता नगर परिषदेच्या क्रीडा मैदानावर करण्यात आली.
या शोभायात्रेत उत्तर रायगड येथील आठ तालुक्यातील 160 सेवाकेंद्रातील सुमारे दोन ते अडीच हजार भक्तगण शोभायात्रेत सामील झाले होते या शोभायात्रेमध्ये 25 कलापथकाने आपली कला सादर केली त्याचबरोबर गुड्या कलशधारी व झेंडे दारी महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या शोभायात्रेमध्ये एकूण नियोजनात सर्व भक्तगण जोमाने कार्यरत झाले होते. शोभायात्रेत सामाजिक शैक्षणिक धार्मिक पौराणिक ऐतिहासिक अशा सर्व क्षेत्रातील स्त्री पुरुष तसेच मुले सहभागी झाली होती या शोभायात्रेमध्ये हिंदू संस्कृतीतील साप्रदायीक पेहराव करून पारंपारिक व अध्यात्मिक रथ सहभागी झाले होते.
उत्तर रायगड मधील पनवेल पेण उरण कर्जत खालापूर सुधागड रोहा अलिबाग येथील सुमारे दोन ते अडीच हजार भाविकांनी या शोभायात्रेमध्ये सहभाग दर्शवला होता या शोभायात्रेमध्ये उत्तर रायगड चे प्रमुख प्रमोद परदेशी जिल्हा निरीक्षक अनिल खामकर जिल्हा सचिव प्रदीप मढवी समाधान पाटील मंगेश ठाकूर पेण तालुका प्रमुख नरेश म्हात्रे सागर माळी रवींद्र भोईर संजय पाटील रमेश पारंगे जिल्हा महिला अध्यक्षा अक्षता माळी आणि पेण तालुका अध्यक्षा संगीता पाटील यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, सर्व सेवा केंद्र ,भक्तगण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Exit mobile version