। अलिबाग । वार्ताहर ।
नागावमधील निखिल मयेकर मित्रमंडळातर्फे दि. 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेत ढोलनाद, लेझीम, झांज, चित्ररथांसह पारंपारिक वेषात नागावचे ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. या शोभायात्रेची सुरुवात सकाळी 7 वाजता नागाव हायस्कूल होऊन सांगता सकाळी 10 च्या सुमारास बागमळा बसस्टॉप येथे होणार आहे. शोभायात्रेची सुरुवात ढोलवादन व सूर्याला वंदन करून होणार आहे त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये गुढीचे पूजन होणार आहे. व नागाव हटाळा बाजार येथे मल्लखांब व मैदानी खेळ सादर करण्यात येणार आहेत.