खेरणेमध्ये मतदानाला प्रतिसाद

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
तालुक्यातील खेरणे ग्रामपंचायतीसाठी रविवारी झालेल्या मतदानात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेतकरी कामगार पक्ष, मनसे पुरस्कृत पॅनल व भारतीय जनता पक्ष पुरस्कृत पॅनल यांच्यात थेट होत असलेल्या लढतीत मतदाना दरम्यान कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये या करता ठेवण्यात आलेल्या कडेकोट बंदोबस्तामुळे गावात शांततेच वातावरण आहे.या निवडणुकीत एकूण 4 प्रभागांमध्ये सरपंच पदाकरीता 2 सदस्य तसेच 11 सदस्य पदाकरिता एकूण 22 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.जवळपास एक हजार 28 इतकी मतदार संख्या असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी 17 ऑक्टोबर रोजी तहसिलदार कार्यालय, पनवेल येथे होणार आहे.

खेरणे ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप,मनसे पुरस्कृत पॅनलकडून थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार हरिश्‍चंद्र म्हात्रे व प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवार गणेश गोंधळी मतदान केल्यानंतर विजयाची खूण दाखविली.

Exit mobile version