| रसायनी | वार्ताहार |
मोहोपाडा रसायनीतील श्री साईबाबा मंदिरात दर गुरुवारी अन्नदान (साईभंडारा) सुरू झाला असल्याने परिसरातील साईंभक्तांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हा साई भंडारा साईबाबा कमिटीच्यावतीने दर गुरुवारी दुपारी 12 वाजता श्री साई आरती झाल्यानंतर साई भक्तांना दिला जात आहे. यावेळी अनेक साईभक्त प्रसाद सेवेचा लाभ घेत आहेत. ज्या साईंभक्तांना अन्नदान करायचे असेल त्यांनी अध्यक्ष 9960940244, उपाध्यक्ष -9850757121 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.