संकल्प यात्रेला राबगावात प्रतिसाद

| पाली | वार्ताहर |

शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे शासनाच्या वतीने आयोजन करण्यात आले असून सदर विकसित भारत संकल्प यात्रा शुक्रवारी सुधागड तालुक्यातील राबगाव येथे पोहोचली. यावेळी संकल्प यात्रेच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच लाभार्थ्यांकडून विविध योजनांचे अर्ज भरुन घेण्यात आले. राबगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी आतापर्यंत लाभ न घेतलेल्या मात्र विविध योजनांसाठी पात्र असलेल्या नागरिकांची नोंदणीही करून घेण्यात आली. पीएम स्वनिधी योजना, स्वनिधी से समृद्धी योजना, आभा कार्ड, आयुष्मान कार्ड योजनांची माहिती देणारे स्टॉल या यात्रेच्या ठिकाणी लावण्यात आले होते. शासनाच्या सर्व योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉलवर अधिकारी व कर्मचायांची नियुक्ती केली होती. कर्मचारीनीं नागरिकांना कागदपत्रांची माहिती देऊन अर्ज भरून देण्यासाठीही सहकार्य केले. याप्रसंगी ग्रामपंचायतच्या सरपंच स्नेहा भोईर, सदस्या संजना वारगुडे, प्रतीक्षा वाळज, सदस्य रमेश हंबीर, पाली पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता मोहिते यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामसेवक तलाठी गावातील महिला बचत गटांतील महिला प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version