तळा तालुका विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद

| तळा | वार्ताहर |

तळा तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग व गणित विज्ञान अध्यापक मंडळ तळा यांच्या संयुक्त विद्यमाने 21 वे तळा तालुका विज्ञान प्रदर्शन गो. म. वेदक विद्यामंदिर तळा येथे उत्साहात पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मंगेश देशमुख, पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, मुख्याध्यापक दिलीप ढाकणे, विज्ञान अध्यापक मंडळाचे तळा तालुका अध्यक्ष राजेंद्र भगत, गणित अध्यापक मंडळाचे तळा तालुका अध्यक्ष विनायक महाडकर, परीक्षक विद्याधर जोशी, विशाल बिराडी, विस्तार अधिकारी दिपक ठाकूर, दरबारसिंग साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राथमिक व माध्यमिक गटात निबंध, वक्तृत्व, प्रश्‍नमंजुषा, प्रतिकृती, माध्यमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य व प्रयोग शाळा परिचर यांच्या प्रतिकृती या स्पर्धा पार पडल्या.

यावेळी प्राथमिक गट निबंध स्पर्धा प्रथम स्नेहल गणेश तांदळेकर अ. ल. लोखंडे पिटसई, द्वितीय जान्हवी जनार्दन पाखड पन्हेळी हायस्कूल, तृतीय स्वरा प्रकाश गायकवाड गो म वेदक विद्यामंदिर तळा, माध्यमिक गट निबंध स्पर्धा प्रथम प्रणाली संदीप रसाळ बोरघर हायस्कूल, द्वितीय अमिषा अनंता कांबळे पढवण हायस्कूल, तृतीय अदिती विवेक विभुते निकम स्कूल तळा, प्राथमिक गट वक्तृत्व स्पर्धा प्रथम हर्षवर्धन धनंजय पवार मराठी शाळा तळा, द्वितीय स्वरा प्रकाश गायकवाड गो म वेदक विद्यामंदिर तळा, तृतीय जान्हवी जनार्धन पाखड पन्हेळी हायस्कूल, माध्यमिक गट वक्तृत्व स्पर्धा प्रथम जयश्री किशोर काप कनिष्ठ महाविद्यालय तळा, द्वितीय प्रवीण हरिश्‍चंद्र सकपाळ महागाव हायस्कूल, तृतीय प्रणाली संदीप रसाळ बोरघर हायस्कूल, प्राथमिक गट प्रश्‍नमंजुषा स्पर्धा प्रथम हर्षवर्धन धनंजय पवार मराठी शाळा तळा, द्वितीय रिया अशोक शिंदे उसर हायस्कूल, तृतीय तेजस हरिश्‍चंद्र सपकाळ महागाव हायस्कूल, माध्यमिक गट प्रश्‍नमंजुषा स्पर्धा प्रथम रुची संतोष गुजर उसर हायस्कूल, द्वितीय अमिषा अनंता कांबळे पढवण हायस्कूल, तृतीय प्रवीण हरिश्‍चंद्र सकपाळ महागाव हायस्कूल, प्राथमिक गट प्रतिकृती स्पर्धा प्रथम स्वरा प्रकाश गायकवाड गो म वेदक विद्यामंदिर तळा, द्वितीय रिया अशोक शिंदे उसर हायस्कूल, तृतीय जान्हवी जनार्दन पाखड पन्हेळी हायस्कूल, माध्यमिक गट प्रतिकृती स्पर्धा, प्रथम जयश्री किशोर काप कनिष्ठ महाविद्यालय तळा, द्वितीय मोहन वसंत शिंदे पन्हेळी हायस्कूल, तृतीय प्रणाली प्रकाश पवार म्हसाडी हायस्कूल, माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य स्पर्धा प्रथम राजेंद्र चंद्रकांत भगत उसर हायस्कूल, द्वितीय देवयानी राकेश मोरे पन्हेळी हायस्कूल, प्रयोगशाळा परिचर स्पर्धा प्रथम संतोष बळीराम बाग उसर हायस्कूल, द्वितीय शरीफ हसनमिया परदेशी उर्दू हायस्कूल तळा आदी स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.या स्पर्धेसाठी तळा तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक गटातून 24 शाळा सहभागी झाल्या होत्या.

Exit mobile version