जीआयझेड प्रोक्लोमा कार्यशाळेला प्रतिसाद

| माणगाव | प्रतिनिधी |
जुई रेफ्रिजरेशन माणगाव यांच्यावतीने आयोजित जीआयझेड प्रोक्लोमा कार्यशाळेला माणगावात ऊस्फूर्त प्रतिसाद लाभला. मॅक्स कुलींग सिस्टीम पुणे यांच्या सहयोगाने जीआयझेड प्रोक्लोमा या शासनमान्य कार्यशाळेचे आयोजन जुई रेफ्रिजरेशन अँन्ड एअरकंडिशनिंग माणगाव यांच्या तर्फे हॉटेल कार्तिक माणगाव येथे सभागृहात संपन्न झाला.

जिल्ह्यातील टेक्निशियन यांनी याचा लाभ घेतला. या ट्रेनिंग प्रोग्राम साठी मॅक्स कुलींग सिस्टीमचे अब्राहम मँथ्यूसर व ट्रेनर म्हणून मुकुंद गुजर ,अजितकुमार थंपी,जॉन लुईस व सी.ए.बिरादार यांनी मार्गदर्शन केल. या कार्यशाळेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळाल्याचे समाधान टेक्निशियन यांनी व्यक्त केले. व जीआयझेड (जर्मन) प्रोक्लोमाच्या वतीने टेक्निशियन यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.यापुढेही अशा कार्यक्रमांबरोबर टेक्निशियनच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सचिन शहा गेली 20 वर्ष सातत्याने अश्या कार्य शाळेचे आयोजन करण्यात यांचे सहकार्य आहे असे कार्यक्रम यशस्वी झाले आहेत.

Exit mobile version