| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोलीतील विणानगर स्वयंसिद्धा महिला मंडळ आयोजित आनंद मेळावा व फूड अँड फन बरोबर मनोरंजनाचा मेजवानीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. माजी उपनगराध्यक्ष कुुलदीपक शेंडे व कल्याणी शेंडे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अपर्णा मोरे, अर्चना पाटील, संदीप पाटील, सचिन मोरे, स्नेहा भोपतराव, रंजना सावंत, हेमलता चोगले, विजया पाटील, रत्ना घोसाळकर, स्मिता घोसाळकर, ऋतुजा चव्हाण, मनीषा पाटील, अस्मिता घोसाळकर, सुप्रिया चोगले, मनीषा नरंगडे, प्रिया ढेरे, स्वप्ना चौधरी, मयुरी विचारे व विणानगर रहिवासी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आशियाना इस्टेट गार्डन प्लॉटमध्ये या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध प्रकारचे स्वादिष्ट खाद्य पदार्थांची दुकाने, लहान मुलांसाठी विविध खेळण्याची दुकाने, दैनंदिन उपयुक्त घरगुती साहित्य अशी अनेक दुकाने लावण्यात आली होती.