नवसंकल्प शिबिराला प्रतिसाद

। खांब । वार्ताहर ।

इन्स्टिट्यूट रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षी नव्याने सुरु केलेल्या ‘विकास मित्र प्रकल्प’ अंतर्गत विद्यार्थी ‘नवसंकल्प शिबीर’ 2024 या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन बुधवारी (दि.10) शिक्षक व निवडक विद्यार्थी गटासाठी करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन विवेकानंद रिसर्च अ‍ॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहाचे प्रमुख व एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड सुशील रूळेकर यांच्या हस्ते करण्यात केले. याप्रसंगी ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिकाचे प्रकल्प प्रमुख ऋतूजा देशमुख, ओंकार बाणाईत, श्रीरंग टोके, प्रथमेश कुलकर्णी उपस्थित होते. तर, या शिबिरात रोहा तालुक्यातील मुख्यतः ग्रामीण भागातील 14 शाळांमधील प्रत्येकी 1 ते 2 शिक्षक व 2 ते 4 विद्यार्थी असे एकूण 50 शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

Exit mobile version