पिरकोन येथे विविध स्पर्धांना प्रतिसाद

| चिरनेर | वार्ताहर |

उरण तालुक्यातील सेवा केंद्राच्या वतीने पिरकोन येथील पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रांगोळी, चित्रकला, वकृत्व व गायन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन उरण तालुका सेवा प्रमुख रमाकांत बंडा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. चिरनेर येथील कस्तुरी कृष्णा म्हात्रे हिने रांगोळीतून काढलेल्या संत तुकाराम महाराजांच्या व्यक्तिचित्राची भावछटा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. त्यामुळे कस्तुरी म्हात्रे ही सर्वोत्कृष्ट रांगोळी स्पर्धेच्या 12 ते 18 या वयोगटातील प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.


रांगोळीच्या गटात वैष्णवी रमेश कोळी (द्वितीय) तसेच रांगोळी मध्ये 19 ते 35 वयोगटात अमिषा बाबुराव खारपाटील (प्रथम) जागृती पारकर (द्वितीय) प्रिया पाटील हिला रांगोळी मध्ये उत्तेजनार्थाचे बक्षीस मिळाले. चित्रकला स्पर्धेत 12 ते 18 वयोगटात वैष्णवी नारायण पाटील (प्रथम), मानसी गणेश घरत (द्वितीय), वीरा विजय गावंड (तृतीय) चित्रकला स्पर्धेत 19 ते 35 वयोगटात पार्थिव प्रकाश पाटील (प्रथम) भाग्यश्री पाटील (द्वितीय) आदिती अजित केणी हिला उत्तेजनार्थाचे पारितोषिक मिळाले.

निबंध स्पर्धेत रोशनी नारायण पाटील (प्रथम) आदित्य कमळाकर केणी (द्वितीय) गायन स्पर्धेत अभिजित आकाश गोंधळी (प्रथम) राज मिथुन पाटील (द्वितीय) तर वकृत्व स्पर्धेत बाळाजी सुरेश रूपनवर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. विविध स्पर्धेचे परीक्षक म्हणून सिद्धेश घरत यांनी काम पाहिले. तर गायन स्पर्धेचे परीक्षण गायिका सुजाता गोंधळी हिने केले. निवेदन विनिता रामदास ठाकूर व बाळाजी रूपनवर यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर नंदा बंडा, संगीता पाटील, मिलन जोशी, किशोर बंडा, सोमनाथ गावंड, बाबुराव खारपाटील, मनीलाल गावंड, मनोहर मोकल, प्रणित ठाकूर, तालुका मेजर सुजित पाटील, सुहास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चिरनेर केळाचा माळ, आक्कादेवी वाडी कोप्रोली वशेणी व सातराहाटी या ठिकाणी 10 सायकलींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रिया पाटील, रसिका पाटील, निर्मला गावंड, विशाल कातकरी, रोहित ठाकूर, ऋतिक पाटील, परेश पाटील तसेच सर्व समित्यांचे पदाधिकारी भक्तगण शिष्य व सर्व गुरुबंधू भगिनींनी विशेष मेहनत घेतली. यावेळी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

Exit mobile version