। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील चिरनेर गावातील शेतकरी कामगार पक्षा तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि. 8 व 9 फेब्रुवारी रोजी येथील मातोश्री मैदानावर मर्यादित षटकांच्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा पार पडली. दरम्यान, प्रीतमदादा चषक 2025 चे उद्घाटन शेकाप नेते तथा पनवेल महानगरी पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी प्रथम शेकापचे दिवंगत नेते काळुशेठ खारपाटील, परशुराम खारपाटील, गजानन पाटील, अनंत पाटील, तुकारामपंत ठाकूर, धनाजी म्हात्रे, जगन्नाथ ठाकूर, दिलीप हातनोलकर यांना अभिवादन करून क्रिकेट सामन्यांची सुरुवात करण्यात आली. या क्रिकेट स्पर्धेत 16 संघानी भाग घेतला होता.
या प्रीतमदादा चषकाचे अजिंक्यपद पिरकोन इलेव्हन या क्रिकेट संघाने पटकाविले आहे. त्यांना प्रीतमदादा आकर्षक चषक व रोख रक्कम 50 हजार रु. असे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तर, उपविजेतेपद दादर येथील जाणता राजा क्रिकेट संघाने प्राप्त केले. त्यांना प्रीतमदादा चषक व रोख रक्कम 25 हजार रु. देण्यात आले. याशिवाय पिरकोन संघातील तेजस पाटील या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजचा सन्मान देण्यात आला. त्याला बक्षीस म्हणून कुलर देण्यात आले. तर, दादर येथील बादल म्हात्रे उत्कृष्ट फलंदाज व रितेश वारी (दादर) उत्कृष्ट गोलंदाज ठरला असून पिरकोन येथील अभिजित गावंड उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरला आहे. या सर्वांना आकर्षक चषक व शूज देण्यात आले.
यावेळी, उद्योगपती राजाशेठ खारपाटील, सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच अरुण पाटील, शेकापचे नरेश घरत, सुरेश पाटील, प्रशांत खारपाटील, मंगेश केणी, चंद्रशेखर मोकल, भास्कर ठाकूर, दत्तात्रेय म्हात्रे, गावंड आदींच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.