। कर्जत । प्रतिनिधी ।
भगवान श्री परशुराम जयंती निमित्त सर्व शाखीय ब्राह्मण सभेच्यावतीने ब्राह्मण प्रीमियर लीगचे कर्जतमध्ये आयोजन करण्यात आले होते. बामचा मळा येथील मैदानावर क्रिकेटचे सामने खेळविण्यात आले होते. या स्पर्धेत सहा संघानी सहभाग घेतला होता. त्यात प्रथम क्रमांक वैद्य वसॅरिरयर्स, दुसरा क्रमांक जय श्री परशुराम, तर तृतीय क्रमांक कुलकर्णी मंडप संघाने मिळवला आहे.
या स्पर्धेचे आयोजन सर्व ब्राम्हण सभेचे कार्यकर्ते ऋषिकेश दातार, सार्थक घरलुटे, दिलीप गोगटे, तुषार जोशी, योगेश साठे, निखिल थत्ते, देवेन कुलकर्णी, प्रथमेश कानडे, दिपंकर सालये, विशाल जोशी, परीक्षित देशपांडे व अथर्व करूळकर यांनी केले होते. ब्राम्हण लीग स्पर्धेचा अंतिम सामना उद्योजक महेश वैद्य यांचा वैद्य वॉरियर्स आणि निनाद बेडेकर व दिलीप गोगटे यांच्या श्री परशुराम संघांमध्ये रंगला होता. या सामन्यात वैद्य वॉरियर्सने श्री परशुराम संघाचा पराभव करून ब्राम्हण प्रीमियर लीग स्पर्धा जिंकली आहे. तर, तिसरा क्रमांक देवेन कुलकर्णी यांचा कुलकर्णी मंडप डेकोरेटर्स संघ आणि चौथा क्रमांक नंदन भडसावळे व मुकुंद मेढी यांचा एन.ए. इलेव्हन संघ यांची पटकावला आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व शाखीय ब्राह्मण सभेचे कार्यकर्ते दीपक बेहेरे, रंजन दातार, डॉ. उपेंद्र सुगवेकर, भालचंद्र जोशी, योगेश साठे, सुनील गोगटे, प्रदीप गोगटे, महेश वैद्य, निखिल थत्ते, जयंत लेले, परेश पांडे मित्र परिवार, महेंद्र तेरेदेसाई, अॅड. अजय मेंढी, प्रवीण गांगल, अॅड. प्रज्ञेश खेडकर, श्रीकांत सहस्त्रबुद्धे, राहुल जोशी व पराग करूळकर यांनी उपस्थिती लावली.