। अलिबाग । वार्ताहर ।
जिल्हा क्रीडा कार्यालय आणि ट्रेडिशनल रेसलिंग असो. रायगड यांच्या संयुक्त विद्यामनाने रायगड जिल्हा शालेय बेल्ट रेसिंग स्पर्धा अलिबागमध्ये संपन्न झाल्या. यामध्ये विविध शाळेतून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन अरुण कुमार वैद्य शाळेचे प्राध्यापक निवास टिवळेकर, वडके विद्यालयाचे शिक्षक सोनवणे, तसेच जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संतोष कवळे यांच्या हस्ते स्पर्धेचे करण्यात आले. यामध्ये मुलींचा सहभाग जास्त होता. यावेळी विजय स्पर्धकाला पदक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, प्रथम क्रमांक येणार्या विद्यार्थ्यांची निवड मुंबई विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तर, पंच म्हणून रोहन गुरव व सोनू कामी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.