। सातारा । प्रतिनिधी ।
पाटण जिल्ह्यात एक धक्कादायक घडली आहे. बकर्या चारून सायंकाळी घरी परतत असताना मुलगी पाय घसरून तलावात पडली. तिला वाचवण्यासाठी चौघांनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पाटणा तालुक्यातील वडावली गावात राहणारे एकाच कुटुंबातील तीन सदस्य बकर्या चारायला गेले होते. त्यांच्यासोबत गावातील एक मुलगा आणि मुलगीही होते. सायंकाळी बकरी चारून सर्वजण घरी परतत असताना एका मुलीचा पाय घसरून ती तलावात पडली. मुलीला वाचवण्यासाठी आई आणि भावाने पाण्यात उडी घेतली. मात्र, तेही बाहेर आले नाहीत म्हणून गावातील अन्य दोन मुलांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही जणांचा तलावात बुडून मृत्यू झाला. तलावाजवळ चपला पाहून गावकर्यांना संशय आला. गावकर्यांनी शोध घेत तलावातून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठण्यात आले.