। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
शिरढोण पाडा येथून एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात बुधवारी (दि.27) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 मे रोजी सायंकाळच्या सुमारास अनिल मनोहर जाधव यांची पंधरा वर्षीय मुलगी तसेच राम राठोड यांची तेरा वर्षीय मुलगी यांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. पंधरा वर्षीय मुलीची उंची पाच फूट, बांधा सडपातळ, रंग काळा असून अंगात पंजाबी ड्रेस लाल रंगाचा घातला आहे. तिला मराठी आणि वडारी भाषा बोलता येते. तर तेरा वर्षीय मुलीची उंची अंदाजे तीन फूट, बांधा मजबूत, रंग नीम गोरा आहे. तिने अंगात काळी जीन्स पॅन्ट, पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. तिला मराठी, हिंदी आणि बंजारा भाषा बोलता येते.







