| माणगाव । वार्ताहर ।
शिवकालीन शस्त्रकला ही नामांकित शस्त्रकला आहे. शिवकालात शस्त्रांना अनन्यसाधारण महत्त्व होते. या काळातील शस्त्रकलेस शस्त्राबरोबरच अंगीभुत कौशल्याला महत्त्वाचे स्थान होते. तलवारबाजी, दांडपट्टा चालविणे, ढाल, कट्यारी, कुकरी, वाघनखे, धनुष्यबाण, भाले इत्यादी शस्त्राना महत्व होते व या शास्त्राने युद्ध केली जात असत.
या युद्धामध्ये शस्त्रांबरोबरच शस्त्र चालविणार्याच्या अंगीभुत कौशल्यालाही महत्त्व होते. आधुनिक काळात शस्त्रांची व शस्त्र चालविणार्या कौशल्यांच्या बाबतीत बदल होत असले तरी शिवकालातील शस्त्रकलेचे शिवप्रेमींनी आकर्षण आहे. लहान, मोठे, तरुण-तरुणी हे प्रशिक्षण घेण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. ही बाब लक्षात घेऊन स्वराज्य स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने माणगाव येथे शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्गास युवक, युवतींबरोबरच, बालक- बालिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
ग्रामीण भागात काही दशकांपूर्वी मर्दानी खेळाच्या रूपाने ही कला पाहायला मिळत होती. मात्र अलीकडे याकडे दुर्लक्ष होत होते ही बाब लक्षात घेऊन स्वराज्य स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने हे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. शस्त्रकला प्रशिक्षक शिरीष नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे प्रशिक्षण वर्ग सुरू झाले असून ग्रामीण व शहरी भागातील शस्त्रकला प्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या वर्गात तलवारबाजी, मल्लखांब, लाठीकाठी इत्यादीचे प्रशिक्षण दिले जात आहे. समीर महामुनकर, सखाराम कदम, सुशील महामुनकर इत्यादींनी या शिबिराचे आयोजन केले आहे. याबाबत प्रसार माध्यमांजवळ बोलताना शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षक शिरीष नाईक म्हणाले शिवपूर्वकालातील शस्त्रकलेचे शिवप्रेमींना आकर्षण आहे.
अलिकडे या कलेकडे दुर्लक्ष होत आहे ही बाब लक्षात घेऊन शिवप्रेमींनी प्रशिक्षण मिळावे या हेतूने या शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात तलवारबाजी, मल्लखांब, लाठीकाठी इत्यादीचे प्रशिक्षण दिले जात आहे. या शिबिरास युवक युवतींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ऐतिहासिक वारसा असलेल्या माणगाव तालुक्यातील शिवप्रेमींना शस्त्रकला, मर्दानी खेळाची आवड, माहीती व्हावी या हेतूने हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिवप्रेमींनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
सखाराम कदम
शिवकालीन शस्त्रकला शिबिराचे आयोजक